लंडन येथील वैज्ञानिकांनी नेक्स्ट जनरेशन ड्रोन विकसित केली असून ही ड्रोन बनविताना गिधाडांच्या पंखांपासून प्रेरणा घेतली गेली असल्याचे समजते. ही ड*ोन विकसित करणार्या संशोधकांत भारतीय वंशांचे संशोधकही सामील आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ साऊथेप्टन व इंपिरीयल कॉलेज ऑफ लंडन येथील संशोधकांनी ही ड्रोन तयार केली आहेत.
नेक्स्ट जनरेशनची ड्रोन तयार
न्यू जनरेशन ड्रोन साठी खास तर्हेथचे पंख विकसित कले गेले आहेत. त्यामुळे दीर्घ पल्ल्याचे उड्डाणही ती करू शकणार आहेत. ही ड्रोन मानवरहित विमानेच असून ती सहज परवडणार्या किंमतीत उपलब्ध होऊ शकणार आहेत. या ड्रोनचे पंख कृत्रिम मांसपेशी सारखे काम करतात व गिधाडांच्या पंखांसारखेच ते लवचिक आहेत. त्यासाठी इलेक्ट्रो अॅक्टीव्ह पॉलिमरचा वापर केला गेला आहे. उड्डाणादरम्यान हे पंख आकार बदलू शकतात. १५ सेंमी लांबीच्या छोटया ड्रोनचा वापर सैन्यात केला जात असून धोकादायक क्षेत्रात टेहळणी करणे अथवा सर्वेक्षणासाठी ती अत्यंत उपयुक्त आहेत.