टाटांची टियागो देणार २४ किमी मायलेज

tiago
टाटा मोटर्सने त्यांची नवी टियागो भारतीय बाजारात सादर केली असून या गाडीचे पेट्रोल व्हर्जन लिटरला २३.८४ किमी व तर डिझेल व्हर्जन लिटरला २७.२८ किमीचे मायलेज देणार आहे. पाच मॉडेल्समध्ये ही कार लाँच केली गेली आहे. तिच्या किमती ३.२० लाखांपासून सुरू होत आहेत. कारचे बुकींग १० मार्चपासून सुरू झाले असून या पूर्वी ही कार झिका नावाने बाजारात येणार होती. मात्र ब्राझीलसह अन्य अनेक देशांत झालेल्या झिका विषाणू उद्रेकामुळे कारचे नांव बदलले गेले आहे.

या कारसाठी अत्यंत अट्रॅक्टीव्ह फिचर्स दिले गेले आहेत. कारमध्ये स्मार्टफोन कनेक्शनसह अँड्राईड सॉफ्टवेअर, कूल्ड ग्लोवबॉक्स इलेक्ट्रीकल फोल्डेड मिरर, आठ स्पीकरसह ब्ल्यू टूथ, एअरबॅग्ज यांचा समावेश आहे. एक्स्प्रेसो ब्राऊन पर्लसेंट व्हाईट, प्लॅटिनम सिल्वर ब्ल्यू व ऑरेंज रेड या रंगात ती उपलब्ध आहे.

Leave a Comment