नवी दिल्ली – कॅनडाच्या मोटरसायकल कंपनी कॅन-ऍमने (Can-Am) नुकतीच एक बाईक बनवली आहे. या बाईकचे वैशिष्टय म्हणजे ही बाईक तीन चाकी आहे. स्पायडर आरटी नामक या बाईकला अमेरिकेतील एका स्थानिक ऑटो शोमध्ये सादर करण्यात आले होते. लांब प्रवास करणाऱ्या रायडर्सना समोर ठेवून या बाईकची निर्मिती करण्यात आली आहे.
जगातील सर्वात आरामदायक तीन चाकी मोटार सायकल
स्पायडर आरटीची वैशिष्ट्य – या बाईकमध्ये इन-लाइन ३ सिलेंडर्स, लिक्विड-कूल्ड इंजिन लावण्यात आले आहे. बाईकमध्ये २ हॅलोजन हॅडलॅम्प्स लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर डिजिटल स्पीडोमीटर, ऑडोमीटर ट्रिप मीटर आणि ऑडियो सिस्टम देखील लावण्यात आला आहे. स्पायडर आरटी लिमिटेडच्या स्टोरेजची क्षमता १५५ लीटर असून याची पेट्रोल टाकीची क्षमता २६ लीटर आहे. अमेरिकेत स्पायडर आरटी लिमिटेडची किंमत ३०,९४९ डॉलर म्हणजे लगभग २० लाख रुपये ठरवण्यात आली आहे.