‘गुगल’ची पंडीत रविशंकर यांना मानवंदना

google
नवी दिल्ली – ‘गुगल’ने ‘डुडल’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक भारतरत्न पंडीत रविशंकर यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. या निमित्त गुगल सर्च इंजिनवर एका उभ्या ठेवलेल्या सतारसोबत वेलीच्या साह्याने गुगल हे अक्षर लिहिण्यात आले आहे. त्यावर कर्सर नेल्यावर पंडीत रविशंकर यांचा ९६ वा वाढदिवस असे वाक्य इंग्रजीत दिसते. अनेक नेटिझन्सनी या डुडलचे स्वागत केले असून, सोशल मीडियावरही त्याबद्दल चर्चा सुरू आहे. २०१२ मध्ये अमेरिकेत पंडीत रविशंकर यांचे निधन झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सतारसाठीच समर्पित केले होते. केंद्र सरकारने १९९९ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते. तत्पूर्वी त्यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ याही सन्मानाने गौरविण्यात आले होते.

Leave a Comment