खाद्यपदार्थ विकणार्या अथवा त्या व्यवसायाशी संबंधित वस्तू विकणार्या ई कॉमर्स कंपन्यांना फूड सेफटी अॅन्ड स्टँडर्ड अॅथोरिटी म्हणजेच एफएसएसएआय नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. नोंदणी शिवाय या प्रकारचा व्यवसाय वा विक्री बेकायदेशीर मानली जाणार असून संबंधिक कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे समजते.
खाद्यपदार्थ विकणार्या ई कंपन्यांना एफएसएसएआय नोंदणी आवश्यक
अन्नसुरक्षा संस्थेचे अध्यक्ष आशिष बहगुणा या संदर्भात माहिती देताना म्हणाले, येत्या काळात खाद्यपदार्थांचा पुरवठा करणार्या फूड पांडा इंडिया, झिमॅटो, स्विजी, पेपरटेप या सारख्या स्टार्टअप कंपन्या व त्यांची उत्पादने विकणार्या फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अमेझॉन सारख्या ई कॉमर्स कंपन्यांना एफएसएसएआय कडे नोंदणी करावी लागेल. या कंपन्यांचे व्यवहार इलेक्ट्राॅनिक पद्धतीने होत असले तरी त्या खाद्यपदार्थ विक्री करत असल्याने त्या एफएसएसएआयच्या अधिपत्याखाली येतात.