आता टपाल विभागही ‘अॅप’ वर

Post-App
गुरगाव: आपण राहत असलेल्या परिसराचा पिनकोड, टपाल (पोस्ट) कार्यालय आणि पोस्टमन यांच्याबद्दलची माहिती देणारे ‘अॅप’ हरयाणा टपाल विभागाने विकसित केले आहे. सध्या सहा जिल्ह्यांची माहिती उपलब्ध असलेल्या या ‘अॅप’वर लवकरच राज्यातील सर्व टपाल कार्यालयांची माहिती मिळणार आहे.

सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कालबाह्य ठरत असलेल्या टपाल विभागालाही माहिती तंत्रज्ञान आणि ई- कॉमर्सच्या माध्यमातून नवे स्वरूप देण्याच्या निर्णयातून हे ‘अॅप’ विकसित करण्यात आले आहे.

हे ‘अॅप’ गूगल प्ले स्टोअरवरून संगणक आणि मोबाईलवर मोफत डाऊनलोड करून घेता येणार आहे.

Leave a Comment