आता कॉल दर होणार कमी

trai
नवी दिल्ली : इंटरकनेक्ट वापर शुल्काचा (इंटरकनेक्शन युसेज चार्ज) दर कमी करण्याचा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) घेतल्यामुळे कॉल दर कमी होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत ‘ट्राय‘ मोबाईलचे इंटरकनेक्शन युसेज चार्ज (आययूसी) शुल्क ५ टक्के घेत होती. पण आता ट्राय हा दर ३ टक्के करण्याची तयारी करण्यात येत असल्यामुळे मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकार जुलैमध्ये २००० मेगाहर्ट्स स्पेक्ट्रमचा लिलाव ७ फ्रिक्वेंसीज प्रमाणे करणार आहे. त्याआधी हा निर्णय घेतल्याने उद्योगला आधार मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोबाईल कंपन्यांना ३२०० कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.

Leave a Comment