आणखी सुरक्षित झाले तुमचे पर्सनल व्हॉट्सअॅप चॅट

whatsapp
मुंबई: व्हॉट्सअॅप तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी आणखी पावले उचलत असून तुमच्या व्हॉट्सअॅपचा डेटा यापुढे कोणीही हॅक करु शकणार नाही. कारण आपल्या ग्राहकांची प्रायव्हसी जपण्यासाठी व्हॉट्सअॅपने ‘एंड-टू-एंड’ एनक्रिप्शन’ ही सुविधा सुरु केल्यामुळे दोन व्यक्तींमध्ये व्हॉट्सअॅपवर पाठवले जाणारे मेसेज, व्हॉईस कॉल आता हॅक करता येणार नाहीत.

कंपनीने हा निर्णय अमेरिकेत मोबाईल कंपनी अॅपल आणि पोलिस तपास यंत्रणा एफबीआय यांच्यातल्या कायदेशील लढाईनंतर घेतला आहे. व्हॉट्सअॅपवर
याआधी दोन व्यक्तींमध्ये पाठवले जाणारे मेसेज सहज हॅक करता येऊ शकत होते. पण दहशतवाद्याचा अमेरिकेत आयफोन चेक करण्यासाठी एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या परवानगीशिवाय फोन हॅक केला होता. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

तुमचा डेटा आणि चॅट/संवाद सुरक्षित ठेवण्याला आमचे प्राधान्य असून हे आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान विकसित केले आहे. तुमचा खासगी संवाद ‘एंड-टू-एंड’ एनक्रिप्शन’द्वारे आणखी सुरक्षित होईल, असे व्हॉट्सअपचे संस्थापक जॅन कौम यांनी म्हटले आहे.

यापुढे तुमचे मेसेज कोणीही पाहू शकणार नाही. ते हॅकर्सनाही शक्य होणार नाही. ‘एंड-टू-एंड एनक्रिप्शन’मुळे व्हॉट्सअप चॅट आणखी सुरक्षित होईल. अगदी समोरासमोर किंवा ‘फेस ट फेस’ संवाद साधल्याप्रमाणेच ते गोपनीय असेल असा दावा व्हॉट्सअपने केला आहे.

Leave a Comment