३ इंच उंची वाढवण्यासाठी खर्च केले ७ लाख

combo
हैदराबाद – कोणालाही हेवा वाटावी अशीच ५फूट ७ इंच इतकी उंची आहे. मात्र असे असूनही आणखी ३ इंचांनी उंच होण्याचा हव्यास २२ वर्षीय तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. हैदराबादमधील निखिल रेड्डीने तब्बल ७ लाख रुपये मोजून उंच होण्यासाठी पाय कापून त्यात रॉड बसवण्याची शस्त्रक्रिया केली.

निखिलने करवून घेतलेली ही ऑर्थोपेडिक सर्जरी तब्बल ७ तास चालली. विशेष म्हणजे कोणी अडथळा आणू नये यासाठी त्याने आपल्या कुटुंबियांच्या नकळत ही शस्त्रक्रिया करुन घेतली. ऑपरेशन टेबलवर जाण्यापूर्वी हैदराबादमधील एका प्रसिद्ध रुग्णालयाला त्याने ४ लाख रुपये दिली आणि आपला मोबाईल फोन स्वीच ऑफ केला.

तीन दिवस मुलाचा थांगपत्ता न लागल्यामुळे निखिलच्या आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे निखिलचा शोध लावला आणि प्रकरणाचा उलगडा झाला. रेड्डी दाम्पत्याने आपल्या परवानगीविना मुलाचे ऑपरेशन केल्याप्रकरणी हॉस्पिटलला धारेवर धरले आहे, तर मुलगा १८ वर्षांवरील असल्यामुळे पालकांची संमती आवश्यक नसल्याचा बचावात्मक पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.

Leave a Comment