संगणकांची या आडनावांशी आहे दुश्मनी

names
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक म्हणजे रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला असतानाच अनेक जणांना संगणकामुळे परेशानी झेलावी लागते आहे याची कदाचित आपल्याला कल्पनाही येणार नाही. ही परेशानी प्रामुख्याने लोकांच्या नांवांसंदर्भात असून अशी अनेक नांवे आहेत जी संगणकांवर रीड केली जात नाहीत. म्हणजे संगणक ही नांवे ओळखत नाही. परिणामी या लोकांना संगणकावरून इंटरनेटच्या माध्यमातून तिकीटे काढणे, आयकर रिटर्न भरणे, विविध प्रकारची बिले भरणे, पासपोर्ट संदर्भातली कामे, रहिवासी दाखले मिळविणे अशी अनेक महत्वाची कामे करणे दुरापास्त झाले आहे. आणि विशेष म्हणजे जगभरातील लोकांना ही समस्या असूनही त्यावर म्हणावा तसा खात्रीशीर उपाय अजून तरी सापडलेला नाही.

अमेरिकेतील जेनिफर नूल ही अशीच त्रासलेली महिला. तिचे लग्नानंतरचे आडनांव नूल म्हणजे एनयूएलएल असे आहे पण संगणक हे नांव ओळखत नाही. त्यामुळे तिने ऑनलाईन तिकीट काढायचे म्हटले तरी तिला ते मिळत नाही. नांव भरताना सिस्टीममध्ये सतत आडनांव टाका हा संदेश येतो. कारण नूल या शब्दाचा अर्थच रिकामा किंवा शून्य असा असल्याने संगणक हे नांव वाचू शकत नाही. अनेक देशांत आडनांव नसतेच. अगदी दक्षिण भारतातही आडनांव नसते. तर अनेक ठिकाणी एक अक्षरी आडनांव असते त्यांनाही हाच प्रॉब्लेम येतो. याच्या उलट जनिस या महिलेच्या आडनावात ३६ अक्षरे असल्याने तिला आडनावासाठी दिलेली जागा पुरत नाही म्हणून ती हैराण आहे.

जपानमध्ये सर्वसाधारणपणे तीन अक्षरी आडनांवे असतात त्यामुळे तेथील मॅकेंझी आडनावाच्या गृहस्थांना कोणतेही काम संगणकाच्या मदतीने करताना वरील प्रकारेच अडचण येते आहे. संगणक तज्ञ सांगतात, प्रॉग्रॅंमिंग करताना सर्वसामान्य नावांचाच विचार केला जातो व प्रत्येक देशासाठी प्रॉग्रॅमिग वेगळे करावे लागते. त्यामुळे कांही नावांबाबत ही अडचण येते हे सत्य आहे पण त्यावर अजून तरी उपाय सापडलेला नाही.

Leave a Comment