शाळेने १६ वर्षांच्या विद्यार्थ्याला दिली ‘मधुचंद्रा’साठी सुट्टी!

honeymoon
मनामा : एक अजब-गजब ट्रेंड सौदी अरेबियाच्या एका शाळेने सुरू केला असून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या शाळेने चक्क ‘मधुचंद्रा’ला जाण्यासाठी सुट्टी द्यायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी अल्पवयीन आहेत.

याबाबत ‘गल्फ न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, नुकतेच १६ वर्षीय अली अल किस्सी या विद्यार्थ्याने उत्तरी सौदी अरेबियाच्या ताबुकमध्ये मंगळवारी धामधुमीत विवाह रचला. या सोहळ्यासाठी अलीचे शाळेतील मित्र, शिक्षक आणि नातेवाईक सहभागी झाले होते. शाळेच्या व्यवस्थापनानेही मग आपल्या विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी ‘हनीमून सुट्टी’ जाहीर करून टाकली. त्यानुसार शाळेने अलीला एका आठवड्याची सुट्टी मंजूर केली आहे त्याव्यतिरिक्त त्याची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.

Leave a Comment