शाओमीच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त अनेक बंपर ऑफर्स

mi
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीचा सहावा वर्धापन दिन असून या निमित्ताने शाओमीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणल्या आहेत. तसेच आज पहिल्यांदाच एमआय ५ हा शाओमीचा नवा स्मार्टफोनही खरेदी करता येणार आहे. शाओमीचा फ्लॅश सेल आज सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक डिव्हाइस आणि स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

फ्लॅश सेलमधील ऑफर:

एमआय पॉवर बँक – २०,०००mAh क्षमतेची पॉवर बँक या फ्लॅश सेलमध्ये पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याची किंमत अवघी १,६९९ रु. आहे

एमआय ५ – हा स्मार्टफोन आजपासून भारतात मिळणार आहे. mi.com या वेबसाइटवर सकाळी ११.०० वाजता, दुपारी २ आणि ५ वाजता यासाठी सेल असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्लॉलक्वॉम स्नॅपड्रॅगन ८२० असणार आहे. १६ मेगापिक्सल कॅमेरा आणि गोरिला ग्लास सपोर्ट असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्ही आज २४,९९९ रु. खरेदी करु शकतात.

रेडमी नोट ३ – मागील महिन्यात लाँच करण्यात आलेला रेडमी नोट ३ हा आजच्या फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला ९,९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे.

शाओमीच्या या फ्लॅश सेलमध्ये इतरही बऱ्याच ऑफर आज देण्यात आल्या आहेत. यामध्ये एमआय ४ आणि रेडमी २ प्राइम या स्मार्टफोनच्या किंमतीत सूट देण्यात आली आहे. एमआय ४ स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल २ हजारांची सूट देण्यात आली आहे. तर रेडमी २ प्राइममध्ये ५०० रु. सूट देण्यात आली आहे. एमआय ४ स्मार्टफोनची सध्याची किंमत १४,९९९ रु. असून या फ्लॅश सेलमध्ये याची किंमत १२,९९९ रु. असणार आहे. रेडमी २ प्राइमची सध्याची किंमत ६,९९९ रु. असून या फ्लॅश सेलमध्ये याची किंमत ६,४९९ रु. असणार आहे.

Leave a Comment