महिंद्राची युवो ब्रँडची पाच नवी ट्रॅक्टर मॉडेल्स

yuvo
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीने कृषी उपकरण क्षेत्रात युवो ब्रँडखाली ट्रॅक्टरची पाच नवी मॉडेल्स सादर केली आहेत. त्यांच्या कीमती ४ लाख ९९ हजारांपासून आहेत आणि ती पाच राज्यात उपलब्ध करून दिली गेली आहेत. हे ट्रॅक्टर ३० ते ४५ हॉसपॉवर क्षमतेचे आहेत.

महिंद्रा १५ ते ५७ हॉर्सपॉवर क्षमतेचे ट्रॅक्टर उत्पादित करते. युवो ब्रँडचे ट्रॅक्टर नवीन प्लॅटफॉर्मवर बनविेले गेले आहेत आणि ते बहुउपयोगी आहेत. अनेक प्रकारच्या शेतीसंदर्भातील कामांसाठी ते उपयोगात आणता येणार आहेत. या ट्रॅक्टरसाठी तयार केल्या गेलेल्या नव्या प्लॅटफॉर्मच्या विकासासाठी कंपनीने ३०० कोटींची गुंतवणूक केली असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment