दहा हजार निर्मितीमूल्य असलेल्या आयफोनचा बाजारभाव ३९ हजार!

iphone-se
नवी दिल्ली – भारतीय बाजारपेठेत अॅपलचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असा गाजावाजा करत दाखल झालेल्या ‘आयफोन एसई’ला आपण येत्या ८ एप्रिल आपलेसे करता येणार आहे म्हणजेच विकत घेता येणार आहे. या फोनची बाजारपेठेतील किंमत कंपनीने ३९ हजार रुपये इतकी जाहीर केली आहे. पण या फोनच्या किंमतीमागील एक धक्कादायक सत्य ‘आयएचएस’ या रिसर्च कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. या रिसर्च कंपनी जाहीर केलेल्या अहवालात या फोनची निर्मिती करण्यासाठी कंपनीला केवळ दहा हजारांचा खर्च आला असल्याचे म्हटले आहे.

अहवालातील माहितीनुसार, ३९ हजारांत ‘आयफोन एसई’चा १६ जीबीचे मॉडेल बाजारात उपलब्ध होणार आहे. पण या फोनचे निर्मितीमूल्य केवळ १०,६५३ रुपये इतके असल्यामुळे कंपनीला एका ‘आयफोन एसई’च्या विक्रीमागे तब्बल २८,३४३ रुपयांचा नफा होणार आहे. दरम्यान, आयफोनचा स्वस्त स्मार्टफोन भारतात दाखल होण्याची चर्चा सुरू असताना त्याची किंमत तीस हजारांपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यात वाढ करून ३९ हजार इतकी करण्यात आली.

Leave a Comment