चाहत्याने बनविला स्कार्लेटसारखा रोबो

Scarlet
हॉंगकॉंग: आपल्या लाडक्या अभिनेत्रीची छबी कायम आपल्या नजरेसमोर असावी यासाठी हॉलीवूडची अभिनेत्री असलेल्या स्कार्लेटसारखा दिसणारा रोबो बनविला आहे. हा रोबो माणसासारखा बोलतो, घरातील कामे करतो आणि डोळा मारून चाहत्यांना घायाळही करतो.

पेशाने ग्राफीक डिझायनर असलेला रिकी याने हा रोबो बनविला आहे. या रोबोचे तांत्रिक नाव मार्क १ असे असून तो बनविण्यासाठी रिकीला दीड वर्ष आणि ५० हजार डॉलर खर्च करावे लागले.

या रोबोमध्ये वारंवार सुधारणा करून त्याला अद्ययावत ठेवण्यात येत आहे.

Leave a Comment