ओपोने आणला सेल्फीप्रेमींसाठी नवा स्मार्टफोन

oppo
चांगल्या फिचर्स घेऊन येणा-या मोबाईलमध्ये सतत मोबाईलच्या विश्वात स्पर्धा सुरू असते. आता या स्पर्धेमध्ये ओपो मोबाईल कंपनीने आपला नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. ‘ओपो एफ१ प्लस’ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. सेल्फीप्रेमींसाठी हा स्मार्टफोन खास आकर्षित ठरणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन गोल्ड आणि रोझ गोल्ड या रंगामध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत २६ हजार ९९० रुपये आहे.

ओपो एफ १ प्लसची खास वैशिष्टये
– ५.५ इंच डिस्प्ले
– अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटींग सिस्टीम
– १०८०x१९२० पिक्सल रेझोल्यूशन
– दोन गीगाहर्टझ ऑक्टाकोअर मीडियाटेक प्रोसेसर
– चार जीबी रॅम
– १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा
– १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– १६ जीबी इंटरनल मेमरी
– २८५० एमएएच बॅटरी क्षमता

Leave a Comment