आता घरबसल्या मिळणार ब्रिटनचा व्हिसा

British-Visa
नवी दिल्ली: ब्रिटनसह अन्य युरोपियन देशांचा व्हिसा आता घरबसल्या मिळविणे शक्य होणार आहे. ‘व्हीएफएस ग्लोबल’ या कंपनीच्या ‘ऑन डिमांड मोबाईल व्हिसा’ या सेवेद्वारे भारतभर ही सुविधा देण्यात येणार आहे.

व्हिसा देण्याच्या सुविधेचे काम करणाऱ्या या कंपनीशी संपर्क साधल्यास कंपनीचा कर्मचारी आपल्या घरी अथवा कार्यालयात येऊन आवश्यक असलेली बायोमेट्रिक माहिती आणि कागदपत्र घेईल. त्याच्या बरोबरच असलेला व्हिसा देणारा अधिकारी त्याची पडताळणी आणि शुल्क आकारून करून तिथल्या तिथे व्हिसा प्रदान करेल.

प्रवाशांचे समूह, बैठका, संमेलने, चर्चासत्र, प्रदर्शने यासाठी ब्रिटनमध्ये जाणाऱ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. ब्रिटन पाठोपाठ हंगेरी, डेन्मार्क या युरोपीय देशांचा व्हिसाही घरबसल्या मिळू शकणार आहे.

Leave a Comment