४ भारतीय पथकांचा नासाच्या रोव्हर चॅलेंजमध्ये समावेश

nasa
वॉशिंग्टन – नासाकडून मंगळ, दूर अंतरावरील ग्रह, लहान आकाराचे ग्रह किंवा चंद्राच्या पृष्ठभागाच्या संशोधनासाठी मानवयुक्त रोव्हर बनविण्याचे आव्हान देण्यात आले होते. यासाठी नासाच्या ह्यमून एक्सप्लोरेशन रोव्हर चॅलेंजमध्ये स्पर्धा करणा-या ८० पथकांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे ४ गट देखील सामील आहेत.

८ एप्रिलपासून अलबामा स्थित यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमध्ये नासाचे वार्षिक रोव्हर चॅलेंज सुरू होईल. भारत, अमेरिका, इटली, जर्मनी, मेक्सिको, कोलंबिया, रशिया आणि पोर्टा रिकोचे जवळपास ८० गट या स्पर्धेत सामील आहेत. महाराष्ट्रातील मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनियरिंग, उत्तराखंडमधील आयआयटी रुडकी, तामिळनाडूची सत्यभामा युनिव्हर्सिटी आणि उत्तरप्रदेशातील स्कायलाइन इन्स्टीटय़ूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी या गटांमध्ये सामील आहेत.

विद्यार्थ्यांच्या गटांना मानवयुक्त रोव्हरांचा आराखडा, निर्मिती, परीक्षण आणि अडथळ्यांनी भरलेल्या एका मार्गावर यांची एकमेकांमध्ये शर्यत या रोव्हर चॅलेंज अंतर्गत घ्यावी लागणार आहे. हे एक अशा क्षेत्राचे प्रतिरुप असेल, जसे दूरवरचे ग्रह, लहान आकाराचे ग्रह किंवा उपग्रहांवर चित्र असते. या पथकांना अडथळ्यांनी भरलेल्या एक चतुर्थांश मैल अंतर लवकरात लवकर पूर्ण करायचे असते. वेगवेगळ्या श्रेणींसाठी या स्पर्धेत पुरस्कार आहेत. हा समारंभ ९ एप्रिल रोजी डेव्हिडसन सेंटर फॉर स्पेस एक्सप्लोरेशनमध्ये होईल असे नासाकडून सांगण्यात आले.

Leave a Comment