वनप्लस एक्सच्या किंमती उतरल्या

oneplus
वनप्लसने त्यांच्या वनप्लस एकस स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या असून हा फोन अॅमेझॉन ऑनलाईनवर १४९९९ रूपयांत मिळत आहे. अर्थात वनप्लस एक्स शँपेन व सिरेमिक यांच्या किंमती मात्र स्थिरच ठेवल्या गेल्या आहेत. शँपेन १६९९९ तर सिरेमिक २२९९९ रूपयांत मिळत आहेत.

गतवर्षी आक्टोबरमध्ये वनप्लस एक्स भारतात १६९९९ रूपये किमतीवर लाँच केला गेला होता. त्याच्या किंमती आता दोन हजारांनी कमी केल्या गेल्या आहेत. या स्मार्टफोनसाठी अँड्राईड ५.१.१ वर आधारित ऑक्सिजन ओएस दिली गेली आहे. पाच इंची फुल एचडी एमोलेड डिस्प्ले, ३ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल स्टोरेज ते मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, हायब्रिड सिम स्लॉट, फ्लॅशसह १३ एमपीचा रियर व ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. कनेक्टीव्हीटीसाठी फोरजी, वायफाय मायक्रो यूएसबी, एफ एम रेडिओ ,एलईटी अशी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment