गुगलच्या प्ले स्टोअरमधून तालिबानी अॅप डिलीट

google
काबूल – गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून इस्लाम मुलतत्ववाद्यांनी तयार केलेले अॅप काढून टाकले आहे. पाश्तो भाषेत हे अॅप होते. तसेच या अॅपमधून अफगाणिस्तान चळवळीसंबंधी फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात होते. हे अॅप १ एप्रिलला लाँच करण्यात आले होते. मात्र लगेचच गुगुल प्ले स्टोअरमधून हे अॅप काढून टाकले आहे. हे अॅप तांत्रिक समस्येमुळे बंद झाल्याचा दावा या ग्रपुने केला आहे.

याबाबत वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार गुगल अॅप पॉलिसीनुसार भडकाऊ भाषण देणे नियमांच्या विरोधात असून हे अॅप या नियमाचे उल्लघंन केल्यामुळेच काढून टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ही माहिती अमेरिकेतील साईट इंटेल ग्रुपने पुरवली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिहादींच्या सर्व हालचालींवर साईट इंटेल ग्रुप लक्ष ठेवून असतो. गुगलने मात्र यासंबंधी काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Leave a Comment