आता ड्रोनद्वारे काढा सेल्फी

selfi-drone
सार्वजनिक ठिकाणी अथवा अन्यत्रही सेल्फी स्टीकने फोटो काढणे युजर्सच्या अंगवळणी पडले असले तरी गर्दीच्या ठिकाणी सेल्फी स्टीकचा लांबलचक दांडा पकडणे व फोटो काढणे बर्‍याचदा कंटाळवाणे होत असल्याचा अनुभवही युजर्स घेत आहेत. यावर उपाय म्हणून ऑस्ट्रेलियन संशोधकांनी सेल्फी ड्रोन बनविले असून ते आंतरराष्ट्रीय बाजारात जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे समजते.

या संदर्भात मासाबले वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियातील आयओटी ग्रूप ने सेल्फी ड्रोन तयार केले असून रोम ड्रोन असे त्याचे नामकरण केले गेले आहे. या ड्रोन मुळे सेल्फी घेताना सेल्फी स्टिक पकडण्यासाठी हात खेचावा लागण्याची गरज रहात नाही. कंपनीचे संचालक इयान इफेल यांच्या म्हणण्यानुसार त्यांना स्टेरायड युक्त सेल्फी स्टीकच बनवायची होती मात्र त्यातील समस्या लक्षात घेतल्यानंतर ड्रोन निर्मितीचा निर्णय घेतला गेला.

सेल्फी स्टीक जितकी लांब धरली जाईल तितकी फोटोची क्वालिटी उत्तम येते. मात्र यात अनेक अडचणी येतात. बराच वेळ हात खेचून धरावा लागतो. त्याऐवजी आपल्या आसपास उडणार्या ड्रोन मधून फोटो घेणे खूपच सहज व सुलभ जाते. हा ड्रोन इतका छोटा आहे की तो खिशात अथवा पर्समध्ये सहज मावतो. पोर्टबल हेच त्याचे वैशिष्ठ आहे.

Leave a Comment