शिओमीची इंडियन हंगामात गुंतवणूक

hunama
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शिओमीने भारतात पहिलीवहिली गुंतवणूक केली आहे. हंगामा या डिजिटल मिडीया कंपनीत कंपनीने २५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे १७० कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून भारतात व्हिडीओ ऑन डिमांड सेवाक्षेत्रातही कंपनी भागीदारी करणार असल्याचे जाहीर कले गेले आहे. कंपनीचे इंटरनॅशनल ऑपरेशन्स प्रमुख ह्यूगो बारा यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनबाहेर कंपनीची ही स्टार्टअपमधली पहिलीच गुंतवणूक आहे. हंगामाच्या व्हिडीओ ऑन डिमांड सेवेला त्यांच्या एमआय प्लॅटफॉर्मशी जोडण्याची तयारीही सुरू केली गेली आहे.

हंगामाचे संस्थापक व सीईओ नीरज राय म्हणाले शिओमीच्या गुंतवणुकीमुळे आम्हाला मूव्ही व टिव्ही सेवा अधिक मजबूत करण्यास हातभार लागणार आहे. दरमहिना ६५ दशलक्ष युजर्स हंगामा प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. शिओमीने भारतात टॉप फाईव्ह स्मार्टफोन श्रेणीत यापूर्वीच स्थान मिळविले असुन चीनमध्ये त्यांनी ५५ विविध कंपन्यात गुंतवणूक केलेली आहे.

Leave a Comment