जपानकडून भारताला पायाभूत प्रकल्पांसाठी १४,२५० कोटी

japan
नवी दिल्ली : जपानने भारतातील डेडिकेटेड फ्रिट कॉरिडॉर प्रकल्पासह पाच प्रमुख पायाभूत प्रकल्पांसाठी भारताला १४,२५१ कोटी रुपयांचे कर्ज देण्यास मान्यता दिली असून अधिकृत विकास सहाय्य अंतर्गत हे कर्ज देण्यात येणार असून मध्य प्रदेशातील ट्रान्समिशन व्यवस्था मजबूत करण्याचा प्रकल्प, ओडिशा एकात्मिक सुधारणा प्रकल्प, डेडिकेटेड फ्रिट कॉरिडॉर यांचा त्यात समावेश आहे.

त्याशिवाय ईशान्य रस्तेजोडणी सुधारणा प्रकल्प आणि झारखंड फलोत्पादन प्रकल्पांसाठीही मदत दिली जाणार आहे. जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेच्या माध्यमातून कर्ज पुरवले जाईल. ही संस्था तांत्रिक सहकार्याच्या स्वरूपात द्विपक्षीय सहाय्य करते. १९५८ पासून भारत आणि जपान दोघांच्याही फायद्याचे आर्थिक सहकार्य करत आहेत.गेल्या काही वर्षात भारत-जपान यांच्यातील आर्थिक सहकार्य मजबूत झाले असून डावपेचात्मक भागीदारीत रूपांतरित झाले आहे.

Leave a Comment