‘एअरसेल’सोबत ‘बीएसएनएल’ची हातमिळवणी

aircel
नवी दिल्ली – ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असणारी भारत संचार निगम लिमिटेड आणि एअरसेल यांनी संपूर्ण देशामध्ये २जी इंट्रा सर्किग रोमिंग करारावर स्वाक्षरी केली आहे. देशामध्ये पहिल्यांदाच सरकारी कंपनीने कोणत्याही खासगी दूरसंचार कंपनीबरोबर हातमिळवणी केली आहे. हा नवीन करार केल्यामुळे देशामध्ये त्यांच्या ग्राहकांना चांगली सुविधा मिळणार आणि ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे, असा दावा दोन्ही कंपन्यांनी केला आहे.

बीएसएनएलने यापूर्वी खासगी कंपन्यांबरोबर हातमिळवणी करून महसूलामध्ये वाढ करण्याचे संकेत दिले होते. कंपनीला दरवर्षी ५०० कोटी रुपयांचा महसूल खासगी कंपन्यांबरोबर इंट्रा सर्किग रोमिंग करार केल्याने मिळणार असल्याचे बीएसएनएलचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले. अन्य खासगी कंपन्यांबरोबर चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

Leave a Comment