आरबीआयचा गृहकर्जदारांना दिलासा

rbi
मुंबई: आज रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेने कपात केली आहे. मात्र सीआरआर दरात कोणताही बदल केलेला नाही. आज रिझर्व्ह बँकेने आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले. आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नवे दर जाहीर केले. नव्या दरानुसार रेपो दर ६.७५ टक्क्यांवरून ६.५० टक्क्यांवर आला आहे. सीआरआरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या सीआरआर दर ४ टक्के आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जावरील व्याज कमी होऊन, कर्जदारांचा मासिक हफ्ता काहीसा कमी होणार आहे.

Leave a Comment