मुंबई – स्मार्टफोन वापरकर्त्यांची वाढती संख्या लक्षात घेता दूरदर्शनने चार मेट्रो शहरांसमवेत १६ शहरांमध्ये मोबाइल फोन पर मोफत टीव्ही बघण्याची सुविधा सुरु केली आहे.
आता स्मार्टफोनवर पहा दूरदर्शन मोफत
दूरदर्शनने याबाबत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात २५ फेब्रुवारीपासून १६ शहरांमध्ये दूरदर्शनची डिजिटल टेरेस्ट्रियल टेलीविजन सर्व्हिस सुरु झाली आहे. या सुविधेमुळे स्मार्टफोन वापर करणा-यांना मोबाईल वरच टीव्ही पाहता येणार आहे.
दूरदर्शनची ही सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, गुवाहाटी, पाटना, रांची, कटक, लखनऊ, जालंधर, रायपुर, इंदौर, औरंगाबाद, भोपाळ, बंगळूरू, अहमदाबाद या शहरांच्या आणि त्याच्या जवळपासच्या भागात ओटीजीवाले स्मार्टफोन्स आणि टॅबलेटवर डीव्हीबी-टी २ डोंगल्सच्या माध्यमातून मोबाइल टीव्हीचा आनंद घेऊ शकतात. या सेवेचा सिग्नल मिळविण्यासाठी मोबाईल वापरकर्त्यांना सॉफ्टवेअर देखील डाउनलोड करावे लागणार आहे. चालत्या गाडीत देखील वायफाय डोंगलच्या मदतीने ही सेवा मिळवू शकता. याच्याव्यतिरिक्त डीव्हीबी-टी २ ट्यूनरवाल्या टीव्ही सेट्स (इंटीग्रेटेड डिजिटल टीव्ही)मध्ये देखील ही सेवा उपलब्ध होईल. हे डोंगल फ्लिपकार्ट, ईबे, स्नॅपडीलसारख्या ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर देखील उपलब्ध आहे.