११ वर्षीय चिमुकलीने ‘लिंबू-पाणी’ विकून कमावले तब्बल ७० कोटी

lemon
नवी दिल्ली : आपल्या हुशारीमुळे तब्बल ७० कोटी रुपयांची कमाई अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या ११ वर्षीय मुलीने केली असून या ११ वर्षीय मुलीचे नाव मिकाईला उल्मेर असे असून आपल्या ‘लेमनेड’ (लिंबू-पाणी) ब्रँडच्या विक्रीचे होल फूड स्टोअर्ससोबत करार केला आहे.

आता टेक्सास, ओकलाहोमा, अरकन्सास आणि लुइसियाना येथील स्टोअर्समध्ये ‘बी स्वीट’ नावाचे हे पेय विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. मिकाईला उल्मेर एबीसी टीव्हीच्या ‘शार्क टँक’ या कार्यक्रमात ६० हजार डॉलर सीड पैशांच्या स्वरुपात जिंकली. हे कार्यक्रम बिझनेस आयडियाद्वारे फंडिंग जिंकण्याची संधी देते.

मिकाइलाने गूगलच्या ‘डेयर टू बी डिजिटल कॅम्पेन’च्या माध्यमातून शोनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही आपल लेमनेड सर्व्ह केले. मिकाईलाने लेमनेड बनवण्याचा फॉर्म्युला घरातूनच परंपरेने तयार केला आहे. विशेष म्हणजे या लेमनेडमध्ये मधाचाही वापर केला जातो. मिकाईला लहान असताना तिच्यावर मधमाशांनी दोनदा हल्ला केला होता. तेव्हापासून तिला मधमाशांची प्रचंड भीती वाटत असे. मात्र, कालांतराने मिकाईलाने मधमाशांबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला मधमाशांबद्दल एकप्रकारची ओढ, कुतूहल निर्माण झाले. तेव्हा मिकाईलाने ठरवले की, घरात परंपरेने चालत आलेल्या लेमनेडमध्ये मध मिसळून काय होते ते पाहूया आणि यातून मिकाईलने लेमनेड तयार केले.

Leave a Comment