मुंग्याही त्यांच्या घरात तयार करतात शौचालय

ant
लंडन : शौचालय ही मनुष्याची निर्मिती आहे असे आपल्याला साधारणपणे वाटते. पण, जर्मनीतील एका विद्यापीठीच्या संशोधकांनी केलेल्या एका संशोधनात मुंग्या त्यांच्या वारूळांत ठराविक ठिकाणी शौचालये तयार करतात, असे निष्पन्न झाले आहे.

मुंग्यांनाही माणसाप्रमाणेच स्वच्छता आवडते आणि त्याबाबतीत मुंग्या गंभीर असतात. या संशोधकांनी मुंग्यांच्या एकेका गटाला विविध रंगाचे खाणे दिले. त्यानंतर त्यांच्या सवयींचा अभ्यास केला. त्यांना आढळलेल्या माहितीनुसार मुंग्यांच्या प्रत्येक वारूळात एक विशिष्ट जागा ही मलविसर्जनासाठी तयार केलेली असते. तिथेच जमा होऊन या मुंग्या आपले नैसर्गिक विधी पार पाडतात. नॅशनल जिओग्राफिकमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यात म्हटले आहे की इतर कीटक मलविसर्जनासाठी आपल्या घरट्यापासून दूर जातात आणि शरीराची स्वच्छता करतात. पण, मुंग्या मात्र त्यांच्या वारूळातच का शौचालयाची निर्मिती करतात, हे समजू शकलेले नाही. या मलविसर्जनाचा त्यांना काहीतरी उपयोग होत असेल, असा संशोधकांना संशय आहे.

Leave a Comment