महिंद्राने लाँच केली ‘नुवोस्पोर्ट’

mahindra
मुंबई : आपली नवी काँम्पॅक्ट एसयुव्ही नुवोस्पोर्ट ही चारचाकी गाडी महिंद्रा मोटर्सने लाँच केली असून ७.३५ लाख रूपये एवढी या गाडीची प्राथमिक किंमत ठेवण्यात आली आहे. ६ प्रकारचे नुवोस्पोर्टचे व्हॅरियंट लाँच करण्यात आले असून यात २ एएमटी व्हॅरियंटचा देखील समावेश आहे.

आकर्षक डिझाईन्स असलेले स्प्लिट हेडलॅम्प, नवीन अलॉय व्हिल्स, नवीन फ्रंट बंपर नुवोस्पोर्टमध्ये दिलेले आहेत. दमदार लुक देण्यासाठी ब्लॅक प्लॅस्टिक क्लॅडिंगचा मोठय़ा प्रमाणात वापर या एसयुव्हीसाठी करण्यात आला आहे. महिंद्राच्या या नव्या गाडीमध्ये ७ आसनांची व्यवस्था आहे. गाडीची अंतर्गत रचना चांगली आहे. टॉप व्हॅरियंट एन-८ मध्ये ६.२इंचाची ब्लूटूथ, युएसबी आणि एफएम रेडिओला सपोर्ट करणारी टचस्क्रीन म्युझिक सिस्टीम यामध्ये देण्यात आली आहे. गाडीतील मधली आसने आपल्या ईच्छेप्रमाणे पुढे-मागे करता येत असून अशी व्यवस्था मारूती व्हिटारा किंवा फोर्ड ईकोस्पोर्टमध्येसुद्धा नाही आहे.

ही गाडी केवळ डीझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. १७.४५ किमी/प्रतिलिटर मायलेजचा दावा कंपनीने केला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने नुवोस्पोर्टमध्ये एबीएस (अँटी लॉक ब्रकिंग सिस्टीम) आणि ईबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रब्युशन) या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. ड्रायव्हर एअरबॅचा देखील पर्याय देण्यात आला आहे.

Leave a Comment