१४ एप्रिलला भारतामध्ये दाखल होणार डटसन रेडी-गो

dutsun-redi-go
मुंबई – भारतीय बाजारपेठेत लवकरच डटसन रेडी-गो ही कार लॉंच होणार आहे. ही एक क्रॉसओवर कार असणार असून जी १४ एप्रिलला भारतामध्ये दाखल होवू शकते. डटसनच्या या एंट्री लेवल हॅचबॅक कारची कॉन्सेप्ट मॉडलची पहिली झलक २०१५मध्ये दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये पाहायला मिळाली होती.

या कारला रेनो-निसान द्वारे संयुक्त विदयमाने सीएमएफ-ए प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. याच प्लॅटफॉर्मवर रेनो क्विडलासुध्दा तयार करण्यात आले आहे. या कारला तामिळनाडू स्थित कंपनीच्या प्लांटमध्ये तयार करण्यात आले असून ही कार दिसायला रेनो क्विडसारखी दिसते. या कारमध्ये हाय-माउंटेड रिअर विंडस्क्रीन लावण्यात आले आहे.

रेनो क्विडच्या तुलनेमध्ये डटसन रेडी-गोची किंमत कमी असणार आहे.परंतु यामध्ये शक्यता आहे की,कारमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरसारखे फीचर्स दिले जावू नये. कंपनीने डटसन रेडी-गोचे इंजिन स्पेसिफिकेशनबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु कारमध्ये ०.८ लीटर पेट्रोल इंजिन आणि १.२ लीटर पेट्रोल इंजिन लावले जावू शकते. या १.२ लीटर पेट्रोल इंजिनचा वापर डटसन गो, गो प्लस आणि निसान मायक्रामध्ये करण्यात आला आहे. या कारमध्ये लावलेले इंजिनचा वेग ५ मॅन्युअल ट्रांसमिशनचा असणार आहे.डटसन रेडी-गोला भारताच्या बाजारामध्ये रेनो क्विड, मारुती सुजुकी अल्टो ८०० आणि ह्युंडई इऑनशी सामना होणार आहे.

Leave a Comment