२०१७मध्ये येणार सॅमसंगचा फोल्डिंग स्मार्टफोन

samsung
सियोल : फोल्डिंग टॅब्लेट-कम-स्मार्टफोन घेऊन दक्षिण कोरियाची जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंग येत असून सॅमसंगकडे आकर्षक लूक्स, अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी इत्यादींमुळे विश्वासाने पाहिले जाते. आता सॅमसंग फोल्डिंग स्मार्टफोन आणणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हा फोल्डिंग टॅब्लेट कम स्मार्टफोन २०१७साली स्मार्टफोनप्रेमींसाठी बाजारात दाखल होणार आहे. हा टॅब्लेट-कम-स्मार्टफोन कधी बाजारात येणार, याबाबत गेल्या काही महिन्यांपासून मोबाईलप्रेमींमध्ये उत्सुकता लागली होती. अखेर पुढल्या वर्षी हे डिव्हाईस बाजारात दाखल होत असल्याने मोबाईलप्रेमी खुश होतील.

Leave a Comment