रात्रीच्या वेळी एटीएम बंद !

atm
नवी दिल्ली : सरकार एटीएम मशीन तोडणे, त्यातील पैशांची लूटमार करणे, अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी रात्री ८ च्यानंतर एटीएम मशीनमध्ये पैसै न टाकण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करीत असून सरकारचा या संदर्भात निर्णय झाला तर रात्री ८ नंतर शहरातील कोणत्याही एटीएम मशीनमधून पैसे उपलब्ध होणार नाहीत. तर ग्रामीण भागात सायंकाळी पाचच्या नंतर आणि नक्षल प्रभावित क्षेत्रात दुपारीत ३ नंतर एटीएम मशीनमध्ये पैसे उपलब्ध असणार नाहीत.

एटीएम मशीन्समध्ये रोकड टाकण्याची वेळ निश्चित करण्याबरोबरच या मशीन्समध्ये पैसे टाकण्यासाठी बँकांकडून पैसे आणण्यासाठी वापरण्यात येणारी कॅश व्हॅनच्या सुरक्षे संदर्भात देखील विविध उपाययोजनांवर सरकार विचार करीत आहे. एटीएम मशीन्समध्ये पैसे टाकण्यासाठी खाजगी कॅश ट्रान्सपोर्टेशन एजन्सीजना दिवसांच्या पूर्वार्धात बँकेतून पैसे काढून घ्यावे लागणार आहे.

एटीएम मधून पैसे काढणे किंवा पैसे टाकण्यासाठी विशेष डिझाईन केलेल्या सीसीटीव्ही आणि जीपीएस युक्त गाड्यांचा वापर अनिवार्य केला जाणार आहे. अशा गाड्यांमधून ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेऊन जाता येणार नाही. धोक्यापासून सावध राहण्यासाठी अशा गाड्यांमध्ये दोन सशस्त्र सुरक्षा रक्षक ठेवणे अनिवार्य असेल. एका वेळेला पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रुपये घेऊन जाण्यासाठी देखील विशेष रित्या तयार करण्यात आलेल्या सुरक्षित गाड्यांचा वापर आवश्यक केला जाणार आहे. जे दोन सुरक्षा रक्षक या गाड्यांसोबत असणार आहेत, त्यांना नोकरीच्या वेळी दोन हमीदार देणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये एक सरकारी कर्मचारी असणे आवश्यक आहे. सरकार अग्रणी खाजगी एजन्सीकडून रोकड सुरक्षितरित्या नेणे आणि आणण्यासाठी नवीन दिशानिर्देश जारी करण्यात आलेले आहेत. ८००० खाजगी मालकीच्या कॅश व्हून दररोज बँका, करन्सी एजन्सीज आणि एटीएसकडून १५ हजार कोटी रुपयांची ने आण करीत असतात. बँकांकडून या कॅश व्हॅनमध्ये रात्रीच्या वेळी पाच हजार कोटी रुपये असतात. सध्या कॅश व्हॅन लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने रात्रीच्या वेळेला एटीएममधून पैसे काढणे किंवा टाकण्याचे व्यवहार बंद करण्याचा निर्णय लवकरच घेण्याची शक्यता आहे.

Leave a Comment