मुंबई : नुकतेच एक नवीन मोबाईल अॅप देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने लाँच केले असून बँकेत गेल्यानंतर रांगेत उभे राहण्याचा ग्राहकांचा वेळ या अॅपद्वारे वाचणार असल्याचा दावा बँकेचा आहे.
या अॅपमुळे वाचेल तुमचा बँकेत वाया जाणारा वेळ
नव्याने लाँच केलेल्या मोबाईल अॅपचे नाव ‘स्टेट बँक ऑफ इंडिया नो क्यू’ असे आहे. ग्राहकांचा अमूल्य वेळ यामुळे वाचू शकेल, असा दावा भारतीय स्टेट बँकेने केला आहे. हे अॅप भारतीय स्टेट बँकेच्या चेअरपर्सन अरुंधती भट्टाचार्य यांनी मुंबईत लाँच केले.
बँकेने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, या अॅपच्या मदतीने बँकेचे ग्राहक भारतीय स्टेट बँकेच्या काही निवडक शाखांमध्ये विविध सेवांची आणि त्या घेण्यासाठी लागणाऱ्या वेळाची माहिती करुन घेऊ शकतात. ग्राहकांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. बँकेच्या सर्व कारभारांचा समावेश या अॅपमध्ये केला गेला आहे. अँड्रॉइडसाठी गूगल प्ले स्टोअर आणि आयफोन यूझर्सना अॅप स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करता येईल.