काळा पैशाच्या यादीत बिग बी बच्चन, ऐश्वर्यासह अनेक दिग्गजांचा समावेश

combo
मुंबई : स्विस बँकेत लपवलेल्या काळ्यापैशाबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते. मात्र, या पैशाबाबत आता धक्कादायक खुलासा पूढे आला असून, त्यात बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, इकबाल मिर्ची, डीएलएफचे के पी सिंह आणि अदानीच्या मोठ्या भावासह इतर तब्बल ५०० दिग्गज मंडळीचा समावेश आहे.

याबाबत इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पनामास्थित एका लॉ फर्म मोस्सैक फेसोकाने ११ मिलियनपेक्षाही अधिक गुप्त दस्ताऐवज उघड केले आहेत. त्यात विदेशी ग्राहकांसाठी कंपनी काढून गुंतवणूक केली जात असल्याचे म्हटले आहे. या दस्तऐवजावरून लक्षात येते की कोणी कोणत्या कंपनीसाठी किती रक्कम गुंतवली.

विशेष म्हणजे यात ५०० भारतीयांनी फार्मा, ट्रस्ट आणि फाऊंडेशनच्या नावाखाली गुंतवणूक केली आहे. या यादीत अनेक नामवंतांची नावे आहेत. ज्यात बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, इकबाल मिर्ची, डीएलएफचे के पी सिंह आणि अदानीच्या मोठ्या भावासह इतर तब्बल ५०० दिग्गज मंडळीचा समावेश आहे. पनामाची लॉ फर्म सोसेक फॉंसेकाने उघड केलेल्या यादीमुळे जगभरातील अनेक बडी मंडळी अडचणीत आली आहे.

पूढे आलेल्या कागदपत्रांवरून ऐश्वर्या राय एका ब्रिटिशकंपनीचे व्हर्जन असलेल्या एका कंपनीची डायरेक्टर आणि शेअर होल्डर होती. तिचे वडील कृष्णा राय, आई वृंदा आणि भाऊ अदित्य राय २००५ मध्ये अमिक पार्टनर्स लिमिटेडमध्ये डायरेक्टर होते. त्यानंतर ऐश्वर्यालाही कंपनीचे शेअरहोल्डर बणविले गेले. दरम्यान, २००८ मध्ये ही कंपनी बंदही झाली.

अमिताभ बच्चन हे महोदयही ब्रिटनचे वर्जिन आईलॅंड आणि बहामसमध्ये चार शिपिंग फर्मचे डायरेक्टर आहेत. दरम्यान, या कंपनीची सध्याचे भांडवल ५००० ते ५०००० डॉलर इतके आहे. मात्र, या कंपनीची उलाढाल काही मिलियन डॉलरमध्ये होते.

समीर गेहलोत यांनी बहामास आणि न्यू जर्जीच्या रस्त्यावरील एक ब्रिटिश रियल्टी फर्मची उभारणी केली आहे. त्यांनी लंडण येथे तीन टॉप प्रॉपर्टी खरेदी केली आहे. तसेच, तेथे सध्या हॉटेलसारखा व्यवसाय सुरू केला जात आहे.

केपी सिंह आणि त्यांची पत्नी इंदिरा यांनी २०१० मध्ये ब्रिटिश वर्जीन आयलॅंडमध्ये एक कंपनी खरेदी केली. २०१२ मध्ये त्यांचे पूत्र राजीव सिंह आणि मुलगी प्रिया सिंह यानी आणखी दोन कंपन्या सुरू केल्या. या तिन्ही कंपन्यांकडे १० मिलियन डॉलर इतका पैसा आहे.

Leave a Comment