उज्जैन सिंहस्थ तयारीला वेग- ११८ विषारी साप पकडले

ujjain
एप्रिल व मे या काळात मध्यप्रदेशातील उज्जैन येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभाची जोरदार तयारी सुरू झाली असून भाविकांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षणासाठी सुरक्षा दले तैनात केली जात आहेत तसेच विषारी साप व मधमाशांपासून भाविकांना संरक्षण देण्यासाठी तज्ञांच्या देखरेखीखाली उपाययोजना केल्या जात आहेत.

भाविकांना विषारी सापांपासून संरक्षण मिळावे या हेतूने वनविभागाच्या सहकार्याने सर्पतज्ञांना तैनात केले गेले आहे. जेथे साप आढळतील तेथे या तज्ञांच्या देखरेखीखाली सापांना पकडून त्यांना जंगलात सोडून दिले जात आहे. आत्तापर्यंत अशा प्रकारे किंग कोब्रा, घोडा पहाड अशा अतिविषारी ११८ सापांना पकडले गेल्याचे समजते. त्याचबरोबर भाविकांना मधमाशांपासून उपद्रव होऊ नये यासाठी सिंहस्थाच्या ठिकाणी पाहणी करून जेथे जेथे पोळी लागली आहेत ती काढून टाकण्याचे काम हाती घेतले गेले आहे. त्यासाठी ७ तज्ञांची नेमणूक केली गेली आहे व आत्तापर्यंत २६ पोळी काढली गेली आहेत असे समजते.

Leave a Comment