आता इंजेक्शनद्वारे पोलिओची नवीन बायोव्हॅलंट लस

polio
पुणे : पोलिओ देशातून जरी हद्दपार झाला असला तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बालकांना तोंडाद्वारे लस देण्यात येत असून येत्या २५ एप्रिलपासून महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये इंजेक्शनद्वारे आणखी एक लस बालकांना दिली जाणार आहे. इंजेक्शनद्वारे देण्यात येणा-या लसीमुळे पोलिओच्या विषाणुंचा नायनाट करणे शक्य होणार आहे.

पोलिओचे पी-१, पी-२, आणि पी-३ अशा प्रकारचे तीन विषाणू आहेत. जगात पी-१ हा विषाणू आढळून आला नाही. सध्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत ट्रायव्हॅलंट लसीचा वापर होत आहे. ही जिवंत लस आहे. त्यात पी-१, पी-२, आणि पी-३ या तीन विषाणूंचा समावेश आहे. पोलिओ लसीत असलेल्या पी-२ मधील जीवं विषाणूचे रूपांतर काही वेळेला अन्य विषाणूंमध्ये होत असल्याने पेशंटमध्ये पोलिओ सदृश्य लक्षणे आढळतात. त्यामुळे ट्रायव्हॅलंटऐवजी पी-२ विषाणूचा समावेश नसलेली बायोव्हॅलंट लस देण्यात येणार आहे.

येत्या २५ एप्रिलपासून ही लस राज्यातील २० लाख बालकांना दिली जाईल अशी माहिती आरोग्य खात्याच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. इंजेक्शनद्वारे अर्थात इनअ‍ॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हायरस व्हॅक्सिन ही लस प्रथमच देण्यात येणार आहे. इंजेक्शनद्वारे लसीचे दोन डोस बालकांना पोलिओच्या पहिल्या व तिस-या डोसबरोबर वयाच्या सहाव्या व चौदाव्या आठवड्याच्या वेळी देण्यात येणार आहेत. लसीकरणापासून वंचित असलेल्या अथवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेवून लसीकरण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. येत्या ७ ते १५ एप्रिलदरम्यान हा तिसरा टप्पा राज्यातील १२ जिल्हे आणि १६ महापालिकांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment