आता आधार कार्डाने एटीएममधून पैसे काढा

dcb
मुंबई : एटीएममधून आधार कार्डाव्दारे पैसे काढण्याची सेवा डीसीबी बँकेने सुरु केली असून यात ग्राहक पिन क्रमांकाऐवजी बायोमेट्रीक डिटेल म्हणजेच शारीरीक चिन्हांचा उपयोग करता येणार आहे. तसेच आपल्या एटीएम कार्डाचा उपयोग करु शकतो.

डीसीबी ही सुविधा सुरु करणारी देशातील पहिली बँक ठरली असल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. ग्राहकाने व्यवहार सुरु करण्यापूर्वी पिनऐवजी १२ अंकी आधार क्रमांक टाकावा किंवा कार्ड स्वाईप करावे. या प्रक्रियेमध्ये तुम्ही देत असलेली माहिती खरी आहे, हे तपासण्यासाठी तुमच्या बोटांचे ठसे एटीएममशीनच्या स्कॅनरवर स्कॅन होतील. अनेक बँक खात्यांमुळे अनेकदा पिन क्रमांक लक्षात रहात नाही. त्यासाठी ही नवी पद्धत चांगली आहे. या सुविधेसाठी बँक खात्याला आधार क्रमांकाने जोडणे आवश्यक आहे. सध्या फक्त डीसीबी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा आहे. आधार कार्डावरील माहितीच्या आधारे चालणारे आम्ही देशातील पहिले एटीएम सुरु केले आहे. जिथे तुम्हाला कार्डाशिवाय व्यवहार करता येऊ शकतो अशी माहिती डीसीबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक मुरली नटराजन यांनी दिली.

Leave a Comment