देशातील प्रमुख कंपन्यांनी सिगरेट उत्पादन थांबविले

cigrette
दिल्ली – देशात सिगरेट उत्पादन क्षेत्रातील प्रमुख कंपन्या आयटीसी, व्हीएसटी यांनी शुक्रवारपासून सिगरेट उत्पादन पूर्णपणे बंद केले असून त्यामुळे देशाचा दररोज ३५० कोटी रूपयांचा महसूल बुडणार आहे. सरकारने सिगरेट पाकिटाच्या ८५ टक्के भागात चित्रमय चेतावणी देण्याचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू केल्यानंतर या आदेशात अस्पष्टता असल्याचे कारण देऊन या कंपन्यांनी उत्पादन थांबविल्याचे समजते.

राजस्थान हायकोर्टात सरकारने १ एप्रिल २०१६ पासून सिगरेट पाकिटांवर ८५ टक्के जागेत चित्रासह सिगरेट धोकादायक असल्याचा वैधानिक इशारा देणे बंधनकारक केल्याचा नियम लागू होत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र हा आदेश पुरेसा स्पष्ट नाही व त्यामुळे सिगरेटचा काळाबाजार वाढेल, नियम उल्लंघन होण्याची भीती वाढेल असा युक्तीवाद तंबाकू इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे. या संस्थेखाली येणार्‍या कंपन्या देशातील ९८ टक्के सिगरेट उत्पादन करतात.

मिळालेल्या माहितीनुसार सिगरेट उत्पादन थांबविल्यामुळे तंबाखू उद्योगातून येणारा दररोजचा ३५० कोटींचा महसूल बुडणार आहे त्याचबरोबर तंबाखू उत्पादनावर अवलंबून असलेले ४.५ कोटी शेतकरी, मजूर, व्यापारी व अन्य कामगारांवरही परिणाम होणार आहे.

Leave a Comment