नवी दिल्ली – कर बुडव्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन उपाययोजना करत असल्यामुळेच यापुढे ५० लाख किंवा अधिक उत्पन्न असणा-या करदात्यांना आपल्या संपत्तीचा खुलासा करावा लागणार आहे. नवीन फॉर्मचा उपयोग १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.
५० लाख उत्पन्न असणा-यांना करावा लागणार संपत्तीचा खुलासा
आपल्या सर्व संपत्तीची माहिती करदात्यांना द्यावी लागणार आहे. तसेच रोख रक्कम, वाहने, ज्वेलरी यांची माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये करदात्यांवर किती कर्ज आहे, याची माहितीही उपलब्ध होणार आहे. २०१६-१७ साठी तयार करण्यात आलेल्या या फॉर्ममुळे ५० लाख अथवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणा-यांची डोकेदुखी वाढली आहे.
सोन्यासारख्या वस्तूंची किंमत करणे अवघड होणार आहे. ५० लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणा-यांना माहिती अनिवार्य केल्यामुळे काळ्य़ा पैशामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लोक वस्तूंची किंमत योग्य पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार नाहीत. तसेच करदाते आपले उत्पन्न ५० लाखापेक्षा कमी दाखविण्याचा प्रयत्न करतील. करदात्याला आयटीआय फॉर्म भरताना सर्व माहिती द्यावी लागणार आहे.