सर्वात मोठ्या नील हिऱ्याचा लवकरच लिलाव

Blue-Dimond
जिनिव्हा: ‘ओपेनहिमर ब्ल्यू’ या जगातील सर्वात मोठ्या नील हिऱ्याचा लिलाव येथील क्रिस्टीज येथे दि. १८ मे रोजी करण्यात येणार आहे. तब्बल १४. ६२ कॅरेटच्या या हिऱ्याला ३८ ते ४५ दशलक्ष डॉलर एवढी किंमत मिळण्याची अपेक्षा आहे.

या हिऱ्याचा निळा रंग हा अन्य कोणत्याही हिऱ्यापेक्षा सर्वाधिक प्रमाणात आणि सर्वाधिक नितळ असल्याने या हिऱ्याला ‘फॅन्सी विविड’ दर्जा देण्यात आला आहे.

या हिऱ्याची मालकी पूर्वी सर फिलीप ओपेनहिमर यांच्याकडे होती. त्यांच्या नावावरूनच या हिऱ्याचे नामकरण करण्यात आले आहे. ओपेनहिमर यांच्या कुटुंबाकडे तब्बल ८० वर्ष ‘डी बेअर्स’ या हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी जगविख्यात असलेल्या कंपनीचे नियंत्रण होते. मात्र काही काळापूर्वी ओपेनहिमर कुटुंबाने आपले ४० टक्के समभाग एका अँग्लो अमेरिकन कंपनीला विकले आहेत.

Leave a Comment