मार्चमध्ये चारचाकी वाहनांची विक्री वाढली

motors
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीच्या मार्च महिन्यातील विक्रीत वार्षिक आधारावर १६ टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात मारुतीने १.२९ लाख वाहने विकली आहे. तर देशातील विक्री १४.६ टक्के वाढून १.१८ लाखांवर गेली आहे. याअगोदर फेब्रुवारीत जाट आंदोलनामुळे कंपनीची १० हजार वाहने कमी विकली गेली होती. मार्चमध्ये मारुतीची निर्यात ३३.४ टक्के वाढून १० हजार ४५० झाली आहे.

देशातील सर्वात मोठी प्रवासी कार निर्यातदार कंपनी ह्युंदाईची विक्री मार्चमध्ये ३.४ टक्के वाढून ५१ हजार ४५२ झाली आहे. मागील वर्षीच्या फेब्रुवारीत ह्युंदाईने ४९ हजार ४७० वाहने विकली होती. देशातील बाजारात कंपनीने मागील महिन्यात ३९ हजार ५२५ वाहने विकली आहे. वार्षिक आधारावर महिंद्रा अँड महिंद्राची विक्रीही १७ टक्के वाढली आहे.

महिंद्राच्या वाहनांच्या विक्रीचा एकूण आकडा ५२ हजार ७१८ राहिला आहे. तर कंपनीच्या व्यावसायिक वाहनांची विक्री २४ टक्के वाढून १७ हजार ४३८ झाली आहे. मार्चमध्ये कंपनीने ३७५१ वाहने निर्यात केली आहे. निर्यातीत ७ टक्के वाढ झाली आहे. तर देशातील विक्री १९ टक्के वाढून ४८ हजार ९६७ वर गेली आहे. मार्च महिन्यात शेती उपकरणे बनवणारी कंपनी एस्कॉर्ट्स ट्रॅक्टरची विक्री २७.९ टक्के वाढून ४५०३ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीने ४२२३ ट्रॅक्टर विकले होते. तर देशातील ट्रॅक्टरची विक्री २८ टक्के वाढून ५३२७ झाली आहे. तर कंपनीने ७६ ट्रॅक्टर निर्यात केले आहेत.

टाटा मोटर्सने मार्चमध्ये ५३ हजार ५७ व्यावसायिक आणि प्रवासी वाहने विकली आहेत. विक्रीत १ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर आर्थिक वर्ष २०१५ – १६ मध्ये कंपनीची वाहन विक्री २ टक्क्यांनी वाढून ५ लाख ११ हजार ७११ वर गेली आहे. देशातील बाजारात टाटा मोटर्सची ३८ हजार २४७ व्यावसायिक वाहने विकली गेली आहेत. तर या महिन्यात कंपनीने ६३५६ वाहने निर्यात केली.

Leave a Comment