सॅन होजे- आपली इलेक्ट्रिक लक्झरी कार भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे टेसला मोटर्सने जाहीर केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मागील वर्षी कंपनीचे मुख्याधिकारी एलॉन मस्क यांनी भारतात आपण ही लक्झरी कार लाँच करणार असल्याची घोषणा केली होती. टेसलाच्या मॉडेल ३ च्या लाँचिंगवेळी ते बोलत होते.
भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार टेसलाची लक्झरी कार
भारतासह ब्राझील, दक्षिण अफ्रिका, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, सिंगापूर आणि आर्यलॅंड येथे आपण ही कार २०१७ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल असे एलॉन मस्क म्हणाले. ही कार ०-६० प्रती तास वेग ६० सेकंदातच गाठते. ही कार एका चार्जिंगवर ३४५ किमी धावते. २०१७ च्या अखेरीस १,१७,००० युनिट पर्यंत विक्री केली जाऊ शकते. एकदा का या कारची निर्मिती सुरू झाली तर तिची विक्री उत्तर अमेरिकेपासून सुरू होणार आहे असे मस्क यांनी म्हटले. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेसला मोटार फॅसिलिटीला भेट दिली होती. या कारची किंमत ३५,००० डॉलर्स अथवा २३ लाख रुपयांच्या आसपास असणार आहे.