फ्लिपकार्टमध्ये फोनपे अॅपचे विलीनीकरण

flipkart
बंगळुरू- फ्लिपकार्टमध्ये फोनपे या मोबाईल ट्रांझॅक्शन प्लॅटफॉर्म अॅपचे विलीनीकरण करण्यात आले असून फ्लिपकार्टच्याच माजी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या कंपनीचे विलीनीकरण फ्लिपकार्टमध्येच करण्यात आले आहे.

फ्लिपकार्टवरील पेमेंट हे या व्यवहारामुळे अत्यंत सुलभ होणार असून त्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचेल असे फ्लिपकार्टच्या सचिन बंसल यांनी म्हटले आहे. फोनपे चे संस्थापक समीर निगम आणि राहुल चारी यांनी या कंपनीची स्थापना केली होती. युनिक आयडेंटिफिकेशन आणि मोबाइल नंबरच्या आधारे आपले पेमेंट सोपे होते. बॅंकेचा अकाउंट नंबर कार्ड नंबर आणि इतर विस्तृत माहिती टाकण्याची यामध्ये आवश्यकता नसते त्यामुळे फोनपे अत्यंत उपयुक्त अॅप असून त्याचा आम्हाल फायदा होईल असे बंसल यांनी म्हटले. विलीनीकरण करून घेण्यासाठी फ्लिपकार्टने किती रक्कम मोजली हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

Leave a Comment