उत्तर कोरियात फेसबुक, यूटयूब, ट्विटर बंदी

banned
ऑनलाईन बातम्यांच्या प्रसारामुळे चिंतेत पडलेल्या उत्तर कोरियाने फेसबुक, यूटयूब, ट्विटर , तसेच दक्षिण कोरियन साईट सारख्या सर्व सोशल मिडीया साईटवर बंदी घातल्याचे जाहीर केले आहे. टपाल व दूरसंचार मंत्रालयाने देशाची मुख्य मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कोरियोलिंक व इंटरनेट युजर्सना माहिती देणार्‍या अन्य माध्यमातून ही घोषणा केली आहे.

उत्तर कोरियात इंटरनेट पाहणार्‍यांची संख्या अनेक बंधनांमुळे मुळातच कमी आहे. येथे फक्त सरकारी इंट्रीनेट साईटच पाहता येते मात्र विदेशी लोकांना सर्फींग करणे शक्य होते. नव्या बंदीमुळे आता या लोकांवरही बंधने येणार असून पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे. उ.कोरियात यापूर्वीच सेक्स, अॅड्ल्ट विषयासंबंधीच्या साईटस ब्लॉक केल्या गेल्या आहेत. येथे पोर्न पाहणे वा दक्षिण कोरियाचे चित्रपट पाहणे हा गुन्हा असून त्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा आहे. विशेष म्हणजे या शिक्षेला माफीची तरतूद नाही.

Leave a Comment