‘आधार’च्या प्रमाणीकरणाची सुविधा असलेला ‘जनुन्नती टॅब’

Janunnati-tab
मुंबई: ‘आधार’चे प्रमाणीकरण करण्यासाठी बोटांचे ठसे तपासणाऱ्या ‘सेन्सर’ची सुविधा असलेला ‘टीपीओएस ७ जनुन्नती टॅब’ येथील ‘डाटा मिनी’ या कंपनीने विकसित केला आहे. या प्रकल्पात कंपनीला ‘इंटेल’ आणि सरकारी हार्डवेअर कंपनी असलेल्या ‘एमएआयटी’ यांनी साथ दिली आहे.

या ‘टॅब’चा उपयोग शासकीय अनुदाने वर्ग करण्याबरोबरच जन धन योजना, ग्रामीण रोजगार हमी योजना अशा अनेक अन्य शासकीय योजनांसाठी करता येऊ शकतो.

‘जनुन्नती टॅब’मध्ये ‘इंटेल’चा ५ झेड ८३०० प्रोसेसर असून २ जीबी रॅमची क्षमता आहे. या ‘टॅब’चा स्क्रीन ७ इंचाचा असून त्याची अंतर्गत मेमरी क्षमता ३२ जीबी आहे. ती ६४ जीबीपर्यंत वाढविता येते. या ‘टॅब’ला ५ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ‘टॅब’ला बीफी ५००० एमएएच बॅटरी बसविण्यात आली आहे.

हा ‘टॅब’ ‘विंडोज १०’च्या होम अथवा प्रोफेशनल यंत्रणेवर चालतो. ३ जी किंवा ४ जी इंटरनेट कनेक्शन या ‘टॅब’वर मिळू शकते. या ‘टॅब’ची किंमत १३ हजार आणि २० हजार असणार आहे.

Leave a Comment