व्हॉटसअ‍ॅपच्या नोटिफिकेशनद्वारेच रिप्लाय करा

whatsapp
व्हॉटसअ‍ॅपने अँड्रॉईड युझर्ससाठी नवे फीचर अ‍ॅड केले असून युझर्स आता कोणताही मेसेज आल्यावर अ‍ॅप उघडल्याशिवाय नोटिफिकेशनद्वारेच रिप्लाय करु शकतील.‘क्विक रिप्लाय’ असे या फीचरचे नाव आहे. हे फीचर अतिशय फायदेशीर आहे, कारण उत्तर देण्यासाठी युझर्सना अ‍ॅप सुरु आणि बंद करण्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही.

कसे काम करते हे फीचर?
उदाहरणार्थ तुम्हाला कोणी व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज केल्यास त्याचे नोटिफिकेशन स्क्रीनवर येते. त्यानंतर व्हॉटसअ‍ॅप उघडून त्या मेसेजला रिप्लाय द्यावा लागतो. पण या अपडेटनंतर आता प्रत्येक रिप्लायसाठी व्हॉटसअ‍ॅप उघडायची गरज नाही. नोटिफिकेशन पॅलनमध्येच रिप्लाय ऑॅप्शन येईल, जिथे तुम्ही टेक्स्ट आणि व्हॉईस मेसेज पाठवू शकता.

शिवाय हे नोटिफिकेशन बंद करु शकता किंवा व्ह्यूव करु शकता. मात्र नोटिफिकेशन रिप्लायद्वारे युझर्स केवळ एकच मेसेज करु शकता. चॅट सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला व्हॉटसअ‍ॅप उघडावेच लागेल.सध्या हे अपडेट गूगल प्ले स्टोअरद्वारे करता येणार नाही. व्हॉटसअ‍ॅपच्या बीटा टेस्टरसाठी हे फीचर देण्यात आले आहे.

Leave a Comment