गुजरातमध्ये सर्वाधिक करबुडवे

gujrat
अहमदाबाद : करबुडव्यांवर कठोर कारवाईचा फास आवळण्याची तयारी केंद्र सरकार करीत असतानाच आयकर विभागाने देशातील करबुडव्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार करबुडविणा-यांची संख्या सर्वाधिक गुजरात राज्यात असल्याचे समोर आले आहे. आयकर विभागाने कर बुडविणा-या ६७ जणांची यादी आहे. त्यापैकी १४ जण गुजरातमधील आहेत.या आधी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशातील २० सर्वांत मोठे कर बुडविणा-यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये तिघे गुजरातमधील होते. गुजरातमधील या २४ जणांनी ५७६.८ कोटी रुपयांचा कर अद्याप जमा केलेला नाही. गुजरातपाठोपाठ महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यातील प्रत्येकी १५ जणांचा या यादीत समावेश आहे.

नेम अ‍ॅण्ड शेम या धोरणानुसार आयकर विभागाने कर बुडविणा-या ६७ जणांची यादी जाहीर केली आहे. या सर्वांनी मिळून तब्बल ३ हजार २०० कोटींचा कर जमा केलेला नाही. ही रक्कम १९८०-८१ ते २०१३-१४ या आर्थिक वर्षातील आहे. गुजरातमधील २४ पैकी १७ जण अहमदाबादमधील आहेत तर अन्य सुरत, राजकोट आणि गांधीधाम येथील आहेत. यापैकी ११ जणांनी प्रत्येकी १५ कोटींचा कर जमा केला नसल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. कर बुडविणा-या पहिल्या २० जणांमधील गुजरातमधील तिघांचा समावेश आहे. त्यांनी १३६.३८ कोटींचा कर बुडविला आहे.अहमदाबाद आयकर विभागातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी १० कोटींपेक्षा अधिक कर जमा न करणा-यांची यादी तयार केली आहे.

तसेच एक कोटींहून अधिक कर रक्कम न भरलेल्यांची यादी तयार केली आहे. या सर्वांना अनेकवेळा नोटीस पाठवूनसुद्धा अद्याप त्यांनी कर न भरल्याचे अधिकारी म्हणाले. आयकर विभागाची नजर ग्रामीण भागातील व्यापा-यांवरही आहे. ज्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक आहे आणि ज्यांनी रिटर्न दाखल केलेले नाही. अशा व्यापा-यांच्या विरोधात आयकर विभागाने सर्वे सुरू केलेला आहे. रिटर्न न भरणा-या व्यापा-यांवर आयकार विभाग दंडात्मक कारवाई करणार आहे.

1 thought on “गुजरातमध्ये सर्वाधिक करबुडवे”

  1. हे नक्कीच लज्जास्पद आहे मिस्टर प्राइम मिनिस्टर !!!

Leave a Comment