इंजेक्शनचा कंडोमला पर्याय

condom
न्यूयॉर्क – महिलांसाठी नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गोळ्या तसेच इतर काही उपाय उपलब्ध आहेत. तर पुरुषांसाठी कंडोमचा पर्याय आहे. आता पुरुषांना लवकरच एक दीर्घकालीन तसेच विश्वासू पर्याय मिळणार आहे. याद्वारे तब्बल एका वर्षापर्यंत पुरुषांना कंडोम वापरण्याची गरज राहणार नाही.

हा उपाय इंजेक्शनचा आहे. ‘वसलजेल’ नावाचे एक इंजेक्शन संशोधकांनी तयार केले आहे. काही वर्षांपासून यावर संशोधन सुरू होते. याचा प्रयोग सशांवर करण्यात आला होता. वर्षभर या इंजेक्शनचा प्रभाव राहतो, असे यात आढळून आले. लवकरच याची मनुष्यांवरही चाचणी सुरू करण्यात येणार आहे. अमेरिकेतील पार्सेमस फाऊंडेशनने हे इंजेक्शन विकसित केले आहे.

पुरुषांसाठी कंडोमचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, तरीही कंडोमचा वापर २० टक्के अपयशी ठरला आहे. नसबंदी हा कायमस्वरुपी उपाय आहे. मात्र, कायमस्वरुपी असल्यामुळे याचा वापर टाळला जातो. यामुळे एक चांगला पर्याय हवा होता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment