५ एप्रिलला व्याजदरात कपात करणार रिझर्व्ह बँक

rbi
नवी दिल्ली- ५ एप्रिल रोजी होणा-या बैठकीत रिझर्व्ह बँक व्याज दर (रेपो रेट) २५ बेसिस पॉइंट्सनी कपात करणार आहे, असे मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालात म्हटले आहे.

जागतिक वित्त सेवेतील प्रमुख संस्थेने २०१६ मध्ये एकूण व्याज दरातील कपात २५ ते ५० बेसिस पॉइंट्सनी होईल. धोरणात्मक व्याज दर कपातीबाबत आमच्या अर्थतज्ज्ञांचे मत बेकार ठरले आहे. मार्च २०१७ मध्ये संपणा-या तिमाहीत महागाईचा दर खूप कमी म्हणजे ४.७५ टक्के असेल, अशी त्याची अपेक्षा आहे, असे संस्थेने म्हटले आहे. बँकेचे वित्तीय धोरण विकास वसुलीला समर्थक असेल, असे मॉर्गन स्टॅनलेने म्हटले आहे.

२०१६ मध्ये ५० बेसिस पॉइंट्सनी कपात होईल, अशी अपेक्षा दोन तृतीयांश गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे. महागाईचा उतरणारा दर व नकारात्मक औद्योगिक वातावरण यामुळे मध्यवर्ती बँकेला व्याज दर कपात करण्यासाठी मजबूत कारण मिळाले आहे.

Leave a Comment