४ रुपयांनी स्वस्त झाला विनाअनुदानित सिलिंडर

lpg
नवी दिल्ली : नैसर्गिक वायूच्या दरात २० टक्के कपात करण्यात आल्यामुळे आता विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात चार रुपयांनी कपात करण्यात आली आहे. कारण आंतराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर आता ३.८२ डॉलर ‘एमएमबीटीयू‘वरून ३.१५ डॉलर ‘एमएमबीटीयू‘पर्यंत कमी करण्यात आल्यामुळे ही दरकपात आजपासून (1 एप्रिल) लागू झाली आहे. वर्षभरातील ही गॅसची तिसरी दरकपात आहे. पण विमानाच्या इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जेट विमानांसाठी लागणाऱ्या इंधनाच्या किंमतीत ३३७१.५५ रूपये प्रति किलोलिटरची वाढ करण्यात आली आहे. ते आता ४२,१५७.०१ रुपये प्रति किलोलिटर करण्यात आले आहे.

Leave a Comment